दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून मोठा गदारोळ राज्याच्या राजकीय वर्तुळात उडाला. विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करताना “एटीएस झोपली होती का?” असा सवाल केला असताना आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी जान मोहम्मद शेखचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

९ तारखेला जान मोहम्मदनं दिल्लीला जायचं नियोजन केलं

“दिल्ली पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. त्यातला एक धारावीत राहणारा आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख आहे. याला फार जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पाकिस्तानातील दाऊदच्या गँगसोबत संबंध असल्याचा त्याचा इतिहास आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती आमच्याकडे नव्हती. ही माहिती दिल्ली पोलिसांना केंद्रीय एजन्सींनी दिली. ९ तारखेला त्यानं दिल्लीला जायचं नियोजन केलं. १० तारखेला त्यानं पैसे देखील ट्रान्सफर केले. पण त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. मग १३ तारखेला गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी त्यानं वेटिंग तिकीट घेतलं. संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला अटक करण्यात आली”, असं एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध

मुंबईत रेकी झालीच नाही

“मुंबईत रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू”, अशी माहिती देखील विनीत अगरवाल यांनी यावेळी दिली. “जान मोहम्मदवर कर्ज होतं. आधी तो एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ती नोकरी सुटली. त्यानंतर त्याने कर्जाने एक टॅक्सी घेतलीच. त्याचा हफ्ता भरू न शकल्याने बँकेच्या लोकांनी टॅक्सी उचलून नेली. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जावर एक टू व्हीलर खरेदी केली. त्यामुळे त्याला पैशांची गरज होती. त्यामुळेच कदाचित या कामासाठी त्याला संपर्क करण्यात आला असावा, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे”, असं विनीत अगरवाल यांनी सांगितलं.

“त्याच्याकडे कोणतीही स्फोटकं, शस्त्र नाही मिळाली. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचं एक पथक आज संध्याकाळी दिल्लीला जात आहे. जान मोहम्मदची चौकशी करेल. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल”, असं देखील अगरवाल यावेळी म्हणाले.

Story img Loader