श्रीनगरमधील बेमिनातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर हल्ला करणारया दहशतवाद्यांना आश्रय देणाऱया व्यक्तीला पोलिसांनी शनिवारी अटक केली. परणदीप सिंग असे या व्यक्तीचे नाव असून, तो जम्मू-काश्मीर सरकारच्या आरोग्य खात्यातील रोजंदारीवरील कामगार आहे.
लष्करे तोयबासाठी काम करणाऱया बशीर अहमद ऊर्फ हारून भाई याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सिंग याचे नाव पुढे आले. तेव्हापासून पोलिस सिंगच्या मागावर होते. सीआरपीएफच्या छावणीवर हल्ला झाल्याच्या दिवसापासून सिंग हा आपल्या घरातून फरार झाला होता. त्याला शनिवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी अगोदर दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उरी भागात तष्करे तोयबाच्या पाच दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली. त्यापैकी दोघेजण नंतर परत माघारी गेले, उर्वरित तिघांनी श्रीनगरमध्ये बस्तान बसवले. त्यांनीच हा हल्ला घडवून आणला.

Story img Loader