पीटीआय, लंडन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतातील लोकशाही संस्थांवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केला जात आहे आणि देशाच्या लोकशाही रचनेला धक्का देण्याच्या प्रयत्नांबद्दल युरोपीय महासंघाच्या (ईयू) काही देशांना चिंता वाटते असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केले. युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी शुक्रवारी ब्रसेल्स येथे पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या जुन्या आरोपांचा पुनरुच्चार केला.
राहुल यांचा युरोपमधील तीन देशांचा दौरा बेल्जियम भेटीने सुरू झाला. गुरुवारी त्यांनी ब्रसेल्स येथे युरोपीय महासंघाच्या काही सदस्यांशी बंद खोलीमध्ये चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मणिपूरमधील मानवाधिकाऱ्यांच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित झाला. जुलैमध्ये युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटने मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करून ठराव संमत केला होता. ब्रसेल्समधील चर्चा यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>>जी २० परिषदेआधी पंतप्रधांनानी घेतली जो बायडन यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
लक्ष विचलित करण्यासाठी ‘इंडिया की भारत’ वाद
भारतामध्ये अलीकडेच देशाच्या नावावरून उद्भवलेला वाद ही विरोधी पक्षांच्या ऐक्यामुळे सरकारची घबराटीतून आलेली प्रतिक्रिया आहे आणि लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे अशी टीका राहुल यांनी केली.