Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर १३ जुलै रोजी हल्ला झाला. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. एका शूटरने बंदुकीतून त्यांच्यावर गोळी झाडली. काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं आणि ते खाली वाचले. त्यानंतर तातडीने सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या भोवती कडं तयार केलं आणि त्यांना घटनास्थळावरुन दूर नेलं. ही घटना ताजी असतानाच ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली. आता या हल्ल्यामागे इराण कनेक्शन आहे अशी चर्चा आता होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत काय घडलं? (What happened at Trump rally? )

डोनाल्ड ट्रम्प हे पेनासेल्वेनिया या ठिकाणी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. अशात तातडीने ट्रम्प हे खाली वाकले. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा रक्षक त्यांच्या भोवती आले. त्यांच्या भोवती कडं तयार करुन त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर जो हल्लेखोर होता त्यालाही ठार करण्यात आलं. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी त्याबाबत संवेदना व्यक्त केली आहे.

ट्र्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार? (Who is responsible for Trump’s security?)

सिक्रेट सर्व्हिस तर्फे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा केली जाते. रिपब्लिक पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की आता आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. ट्रम्प यांची सभा असताना इमारतीच्या छतावर तो हल्लेखोर पोहचलाच कसा? याचा तपासही आम्ही करत आहोत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एकाहून अधिक राऊंड फायर केले. डोनाल्ड ट्रम्प हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली. या हल्ल्यामागे इराण असल्याची चर्चा का होते आहे? ते जाणून घेऊ.

हे पण वाचा- “भगवान जगन्नाथांनी वाचवले डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राण”; काय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि भगवान जगन्नाथ रथयात्रेचे कनेक्शन?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या हल्ल्यामागे इराण असल्याची चर्चा का?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराण असल्याची चर्चा होते आहे याचं कारण म्हणजे इराणला जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा सूड घ्यायचा आहे. त्यामुळे इराणने ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला आहे ही चर्चा होते आहे. सीएननच्या वृत्तानुसार अमेरिकेतील अधिकाऱ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जातो आहे अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ट्रम्प यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसंच हल्ल्यानंतरही त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इराणने मात्र त्यांच्यावर होणारे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेतील इराणच्या एका प्रवक्त्याने हे म्हटलं आहे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण च्या दृष्टीकोनातून डोनाल्ड ट्रम्प हे एक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी खटला दाखल केला गेला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. इराणने न्यायासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला पाहिजे असंही ते म्हणाले. तसंच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांना एका माणसाने इराण डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं सांगितलं होतं.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार (फोटो-एक्स)

अमेरिकेतील सुरक्षा अधिकाऱ्याने काय म्हटलं?

अमेरिकेतल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे की पेन्सिल्वेनिया येथील प्रचारसभेच्या आधी सिक्रेट सर्व्हिस एजन्सी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅम्पेन टीम यांना हल्ला होऊ शकतो अशी कल्पना आम्ही दिली होती. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजन्सीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ केली. या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी घडल्या होत्या. जानेवारी २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कासिम सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ते इराणच्या निशाण्यावर आहेत असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on donald trump is it the revagne of kasim sulemani death what is the iran theory scj