तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत चिथावणीखोर कृत्ये केल्याचा आरोप असलेले काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर भागात एका लग्न समारंभात शीख युवकाने हल्ला केला व शिवीगाळही केली. या युवकास अटक करण्यात आली असून टायटलर हे हल्ल्यातून बचावले आहेत. तेवीस वर्षे वयाचा सेहज उमंग भाटिया याने टायटलर यांना काचेचा तुकडा फेकून मारल्याची घटना काल रात्री मेहरौली येथे एका फार्महाउसवरील विवाहप्रसंगी घडली. टायटलर हे लग्न समारंभासाठी उपस्थित होते. हल्लेखोराने मारलेला काचेचा तुकडा टायटलर यांना लागला नाही.

Story img Loader