Blast in Pakistan’s Karachi : पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या गाड्या आणि धुराचे लोट व्हिडिओतून दिसत आहेत.

पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (प्रायव्हेट) लिमिटेडच्या चिनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याचे चीनी दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे. त्यात पाकिस्तानी जवानही मारले गेल्याचे म्हटले आहे.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू

डॉनच्या वृत्तानुसार, “सीआयडीचे महासंचालक आसिफ एजाज शेख म्हणाले की, स्फोटाच्या स्वरूपाबाबत सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही.” स्थानिक टीव्ही स्टेशन जिओ न्यूजला प्रांतीय गृहमंत्री झिया उल हसन म्हणाले की, “हा स्फोट परदेशी लोकांना लक्ष्य करणारा हल्ला होता.” उपमहानिरीक्षक पूर्व अझफर महेसर म्हणाले की, “हे तेल टँकरचा स्फोट असल्यासारखे वाटत होते.”

चिनी निवेदनात या स्फोटाला “दहशतवादी हल्ला” असे संबोधण्यात आले आहे आणि या स्फोटाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी ते पाकिस्तानसोबत काम करत असल्याचे म्हटले आहे. “पाकिस्तानमधील चिनी दूतावास आणि वाणिज्य दूतावास या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतात (आणि) दोन्ही देशांतील निष्पाप बळींबद्दल तीव्र शोक व्यक्त करतात,” असे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा > इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

“विमानतळाची इमारत आणि मालमत्ता सुरक्षित असताना विमानतळाजवळील मॉडेल कॉलनी रस्त्यावर स्फोट झाला होता. संबंधित संस्था स्फोट/अपघाताच्या कारणांचा तपास करत असताना विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी पाठवली” ,असे नागरी उड्डयन प्राधिकरणाचे प्रवक्ते सैफुल्ला यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

बीएलएने स्वीकारली जबाबदारी

दरम्यान, कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी फुटीरतावादी दहशतवादी गट बीएलएने स्वीकारली आहे.