राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
पुंछ येथे भारतीय सैनिकांच्या पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या हत्येला ‘अघोरी कृत्य’ असे संबोधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यूपीए शासनावर जोरदार शरसंधान केल़े तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानी सैन्यावर पूर्ण नियंत्रण असल्याचा विश्वास दाखवीत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेत संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्याशी चर्चा करू नये, अशीही मागणी संघाने केली आह़े
पाकिस्तानी लष्कर भारतात घुसून भारतीय लष्कराची कत्तल करीत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे हे खुळचटपणाचे आह़े पाकिस्तान भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याबाबत गंभीर आहे, हे भारतीयांसमोर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानला पुरेसे प्रयत्न करून दे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटल़े
संघ पाकशी चर्चा करण्याच्या विरोधात नाही़ पण आपण दुर्बल आणि शरणार्थी असल्यासारखे चर्चा करावी हे कदापि स्वाकारार्ह नाही़ पुंछ येथील हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री ए़ के. अॅण्टनी यांनी, ‘हल्लेखोर पाकिस्तानी सैनिक नव्हे तर अतिरेकी असल्याचे विधान केल्यामुळे तर देशाला मोठा धक्काच बसल्याचेही ते म्हणाल़े हल्ल्यातील पाकिस्तानी लष्कराचा सहभाग नसल्याचे विधान करून संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला जबाबदारी झटकण्याची संधीच दिली आहे, अशी टीका माधव यांनी या वेळी केली़
अॅण्टनी यांचे बोलणे बेजबाबदारपणाचे असून यूपीए शासनामध्ये देशाच्या सीमा आणि सैन्याचे संरक्षण करण्याची धमक नाही, हेच यावरून सिद्ध होत आह़े असेही माधव या वेळी म्हणाल़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा