कानपूर : रेल्वे रुळांवर ठेवण्यात आलेल्या एलपीजी सिलिंडरला आदळल्यानंतर भिवानी-प्रयागराज कालिंदी एक्स्प्रेस थांबली आणि मोठा अपघात टळला. रुळांवर एलपीजी सिलिंडर, पेट्रोलची बाटली, काडेपेटी आदळल्याने ही एक्स्प्रेस उडवून देण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री ८.२० च्या सुमारास ट्रेन भरधाव धावत असताना कानपूरजवळ ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) याचा स्वतंत्रपणे तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त (पश्चिम) राजेश कुमार सिंह यांनी दिली आहे. एलपीजी सिलिंडर रुळावर ठेवून कालिंदी एक्स्प्रेस रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी न्यायवैद्याक पथकाला पाचारण करण्यात आले असून रेल्वे सुरक्षा दलही या प्रकरणाचा तपास करत असल्याचे ते म्हणाले. एलपीजी सिलिंडर रुळावर ठेवल्याचे दिसताच लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक दाबला. रेल्वे थांबण्याआधीच सिलिंडरला धडक देत तो रुळावरून दूर फेकला. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि गेटमनला याची माहिती दिल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हरीश चंद्र यांनी सांगितले आहे. दोषींचा शोध सुरू असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी रेल्वेने अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिवराजपूर येथे भारतीय न्याय संहिता, विस्फोटके कायदा आणि रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt made to derail kalindi express by placing lpgcylinder on tracks in kanpur zws