नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक व ‘’भुरा’’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे लेखक शरद बाविस्कर यांना दिल्लीतील गुंडगिरीचा फटका बसला. बाविस्कर यांचे शुक्रवारी रात्री त्यांच्याच कारमधून काही गुंडांनी अपहरण केले, त्यांना डांबून ठेवले गेले, त्यांच्याकडून रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर काही तासांनी त्यांना सोडून देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रेंच भाषेचे प्राध्यापक असणारे बाविस्कर यांच्यावर अचानक ओढवलेल्या अपहरणाच्या प्रसंगामुळे त्यांना मानसिक धक्का बसला असून पहाटे ३ वाजता ‘’जेएनयू’’मधील घरी परत आल्यानंतर त्यांनी छोटी फेसबुक पोस्ट लिहून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. अपहरणाच्या घटनेसंदर्भात वसंत कुंज पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.

‘उत्तर दिल्लीतील सासू-सासऱ्यांच्या घरी माझी पत्नी व मुलगी या दोघींना सोडून मी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ‘जेएनयू’कडे येत असताना धौला कुआँ भागात मला काही गुंडानी अडवले. विशीतील तीन-चार तरुणांनी त्यांच्या कारला माझ्या होंडा सिटी कारने धडक दिल्याचा आरोप करत शिवीगाळ केली, दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर या गुंडानी माझ्याच कारमध्ये बळजबरीने मला बसवले आणि पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगितले. पण, काही वेळाने भिकाजी कामा पुलापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कार निर्जन वस्तीत नेली. तिथेही पाच-सात गुंडांनी मला घेरले. त्यांनी एका घरात मला कोंडून घातले, माझे कपडे फाडले, ६० हजारांची रोख रक्कम काढून घेतली, पैशांचे पाकीट, क्रेडिट कार्ड हिसकावून घेतले. माझे चित्रीकरण केले. अपहरणाचे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये असा विचार करून कदाचित या गुंडांपैकी तिघांनी मला सोडून दिले’’, अशा शब्दांत प्रा. बाविस्कर यांनी घडलेला संपूर्ण प्रसंग कथित केला.

‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक असल्याचे कळताच या विशीतील गुंडांनी ‘’एनआरसी’’सारख्या वादग्रस्त मुद्दय़ांबद्दल मत काय, अशी विचारणा करत बाविस्करांना शारीरिक इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला. ‘मोदी जिंदाबाद’च्या घोषणा देण्याची बळजबरीही केली. त्यानंतर दोन-तीन तासांनी या गुंडांनी सोडून दिले, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली. दिल्लीत रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तीला मारहाण करून लुबाडण्याचे प्रकार सातत्याने होत असतात, या गुंडांनाही पैशांसाठीच मला पकडले असावे, असे बाविस्कार यांचे म्हणणे आहे. 

‘एनआरसी’बाबत विचारणा

‘जेएनयू’मध्ये प्राध्यापक असल्याचे कळताच या विशीतील गुंडांनी ‘एनआरसी’सारख्या वादग्रस्त मुद्दय़ांबद्दल मत काय, अशी विचारणा करत बाविस्करांना शारीरिक इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न केला. ‘मोदी जिंदाबाद’च्या घोषणा देण्याची बळजबरीही केली. त्यानंतर दोन-तीन तासांनी या गुंडांनी सोडून दिले, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली. दिल्लीत रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावर एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तीला मारहाण करून लुबाडण्याचे प्रकार सातत्याने होत असतात, या गुंडांनाही पैशांसाठीच मला पकडले असावे, असे बाविस्कर यांचे म्हणणे आहे.