Atul Subhash Child Custody : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बेंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. यानंतर त्यांच्या आईने त्यांच्या चार वर्षांच्या नातवाचा ताबा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, अतुल सुभाष यांच्या मुलाचा ताबा त्यांच्या आरोपी पत्नीकडेच राहिल हे स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाशी संवाद साधला आणि त्यानंतर तो आई निकिता सिंघानियाकडे राहिल असा निर्णय दिला. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, अतुल सुभाष यांच्या मुलाच्या ताब्याचा मुद्दा खटला चालवणाऱ्या न्यायालयासमोर उपस्थित केला जाऊ शकतो.

अतुल सुभाष यांच्या आई अंजू देवी यांनी त्यांच्या नातवाचा ताबा मिळावा यासाठी दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्या “मुलासाठी अनोळखी” असल्याची टिप्पणीही केली होती.

३४ वर्षीय तंत्रज्ञ सुभाष ९ डिसेंबर २०२४ रोजी बेंगळुरूच्या मुन्नेकोलालू येथील त्यांच्या घरी मृत अवस्थेच आढळले होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि त्यांच्या सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करणारे व्हिडिओ आणि चिठ्ठी लिहिली होती.

या घटनेनंतर अतुल सुभाष यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली व पुढे सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला होता. ४ जानेवारी रोजी, बेंगळुरूच्या शहर दिवाणी न्यायालयाने अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना जामीन मंजूर केला होता.

या प्रकरणातील आरोपी निकिता सिंघानिया, निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांना १५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर, तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते.

कोण आहे निकिता सिंघानिया?

अतुल आणि निकिता यांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांची २०१९ मध्ये एका विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी २०२१ मध्ये त्यांनी विवाह केला. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांच्यामध्ये सर्वकाही सुरळीत होते. पण, काही दिवसांनी परिस्थिती बिघडली. दरम्यान अतुल यांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्यांची पत्नी निकिताची आता देशभरात चर्चा होत आहे. अतुल यांनी पत्नीवर पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul subhash child custody battle supreme court bengaluru techie suicide nikita singhania aam