Atul Subhash Suicide: बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. अतुल सुभाष यांनी यापुढे त्यांच्याशी संबंधित खटल्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करावे, अशी मागणी केली आहे. जेणेकरून सर्वांनाच कायदेशीर प्रक्रियेची भयानक बाजू समजू शकेल, असे ते म्हणाले.

अतुल सुभाष हे मुळचे उत्तर प्रदेशमधील असून त्यांनी सोमवारी बंगळुरूच्या मुन्नेकोलाल येथे राहत्या घरी आत्महत्या केली. अतुल यांचा भाऊ विकास कुमार यांनी अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्याविरोधात बंगळुरूच्या मराठाहळ्ळी पोलीस ठाण्यात आत्महत्येक प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशला गेले आहेत.

Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
policemans wife committed suicide by hanging herself in Swargate Police Colony on Friday
पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या- स्वारगेट पोलीस वसाहतीतील घटना
The state government set up a medical committee to ensure patients right to die with dignity
‘सन्मानाने मृत्यू’साठी मार्गदर्शक तत्त्वे; अंमलबजावणीसाठी समिती
Wife beat husband somwar peth, Wife beat her husband pune, Wife pune, pune latest news,
पुणे : पत्नीकडून एकाला लाटण्याने बेदम मारहाण, करंगळीचा चावा घेऊन दुखापत; पत्नीविरुद्ध गुन्हा
case of triple talaq come to light in Bhiwandi man threw his wife out of house saying talaq three times
तलाक, तलाक, तलाक… म्हणत पत्नीला घराबाहेर काढले महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Mumbai pilot girl
वैमानिक तरूणीचा मृत्यू : आत्महत्येपूर्वी आरोपी मित्राला व्हिडिओ कॉल

हे वाचा >> Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक

अतुल सुभाष यांची सुसाइड नोट इंडियन एक्सप्रेसच्या हाती लागली आहे. त्यांनी या नोटमध्ये शेवटच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. पत्नी आणि तिच्या कुटुंबियातील कुणालाही माझ्या पार्थिवाच्या शेजारी फिरकू देऊ नका, अशी एक इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या सुसाइड नोटमध्ये त्यांनी पत्नीसह झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणाचे स्क्रिनशॉटही जोडले आहेत. तसेच त्यांच्याशी निगडित न्यायालयीन खटले उत्तर प्रदेशहून बंगळुरूत हस्तांतरीत करण्यात यावी, असेही अतुल सुभाष यांनी म्हटले.

‘माझ्या शेवटच्या इच्छा’ म्हणत १२ इच्छा व्यक्त केल्या

  • माझ्या सर्व न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे. जेणेकरून संपूर्ण देशाला माझ्या खटल्याबाबत आणि देशातील भयंकर न्यायव्यवस्थेबाबत माहिती मिळेल. तसेच महिला कायद्याचा कसा गैरवापर करतात, हेही दिसेल.
  • मी तयार केलेला व्हिडीओ आणि सुसाइड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरावा.
  • मला भीती आहे की, उत्तर प्रदेशच्या न्यायालयाचे न्यायाधीश पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, त्यामुळे माझ्या खटल्यावर परिणाम होईल. माझ्या अनुभवानुसार उत्तर प्रदेशपेक्षा बंगळुरूमधील न्यायालय अधिक न्यायप्रिय आहेत. त्यामुळे माझी इच्छा आहे की, माझे सर्व खटले बंगळुरूथ हस्तांतरित करावेत.
  • माझ्या मुलाचा ताबा माझ्या पालकांकडे द्यावा. जेणेकरून ते त्याला चांगल्या संस्कारासह वाढवतील.
  • माझी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांना माझ्या पार्थिवाजवळ येऊ देऊ नका.
  • माझा छळ करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत माझे अस्थी विसर्जन करू नका. जर न्यायालयाने भ्रष्ट न्यायाधीश, पत्नी आणि इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले तर माझ्या अस्थी न्यायालयाबाहेरील कोणत्याही गटारात वाहून टाका.

हे ही वाचा >> Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा

  • माझा आपल्या न्यायालयीन व्यवस्थेवर फारसा विश्वास नाही, तरीही माझा छळ करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असे मला वाटते. असे झाले नाही तर माझ्या पत्नीसारख्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यात समाजातील इतर मुलांवर अशाच खोट्या केसेस दाखल होतील.
  • माझे आई-वडील, भाऊ यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
  • माझा छळ करणाऱ्या दृष्ट लोकांशी कोणतीही तडजोड करू नये, तसेच त्यांना कठोर शिक्षा द्यावी.
  • माझ्या पत्नीला शिक्षेपासून वाचण्यासाठी खटले मागे घेण्याची परवानगी देऊ नये.
  • माझी पत्नी आता सहानुभूती मिळविण्यासाठी माझ्या मुलाला न्यायालयात घेऊन येण्याची शक्यता आहे. कारण याआधी ती कधीही मुलाला घेऊन न्यायालयात आली नव्हती. कारण तिला माझी आणि मुलाची भेट होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे अशा नाटकीपणाला थारा देऊ नये.
  • जर यापुढेही पत्नी आणि तिच्या कुटुंबियांकडून छळ सुरूच राहिल्यास माझ्या आई-वडिलांनी न्यायालयाकडे औपचारिकपणे इच्छा मरणाची मागणी करावी. यापुढे देशात नवऱ्यासह त्याच्या आई-वडिलांनाही मारून टाकावे, जेणेकरून न्यायव्यवस्थेचे एक काळे युग प्रस्थापित करता येईल.

Story img Loader