पत्नी आणि सासरच्या लोकांना कंटाळून बंगळुरूतील एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर येताच सोशल मीडियावर हलकल्लोळ माजला आहे. आत्महत्येआधी त्याने जवळपास एक तासाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि सासरच्यांवर अनेकविध आरोप केले आहेत. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यासह त्याच्या आईवडिलांना कसा त्रास दिला याची सविस्तर माहिती त्याने व्हिडिओद्वारे दिली आहे.

अतुलवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी त्याच्याकडून तीन कोटी रुपये मागितल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला आहे. तसंच, त्याच्या पोटच्या मुलाला भेटण्याकरता ३० लाखांची अतिरिक्त मागणी केल्याचाही आरोप त्याने केलाय.

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

त्याने शेवटी पलिसांना आवाहनही केले आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींना उभंही करू नका, असं तो म्हणालाय. तसंच त्याला न्याय मिळत नाही तोवर त्याच्यावर अंतिम संस्कार होऊ नये, अशीही त्याने मागणी केली आहे. एवढं सर्व होऊनही जर आरोपींना मुक्त केले गेले तर माझी राख न्यायालयाजवळील गटारात टाकून द्या, अशी उद्विग्नताही त्याने व्यक्त केली. त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ जवळपास एक तासांचा असून त्याने अनेक आरप केले आहेत. तसंच, हे आरोप खरे असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलंय. त्याच्या व्हिडिओवर अनेक कॉमेंट आल्या असून मर्द को भी दर्द होता है असं अनेकांनी म्हटलंय.

तासाभराच्या व्हिडिओमध्ये त्याने काय म्हटलंय?

सुरुवातीलाच त्याने त्याची ओळख करून दिली. “मी अतुल सुभाष असून ३४ वर्षांचा आहे. आज मी आत्महत्या करायला जात आहे. याच्याामागे पाच माणसं आहेत. प्रिसिंपल फॅमिली कोर्ट न्यायाधीश नीता कशिक, माझी पत्नी निकिता सिंघानिया, माझी सासू निशा सिंघानिया, मेव्हणा अनुराग सिंघानिया, माझे पत्नीचे काका हे याला कारणीभूत आहेत”, असं तो म्हणाला.

मला आणि माझ्या कुटुंबियाला खूप त्रास दिला गेला. त्यामुळे मला स्वतःला संपवणं हाच एक मार्ग माझ्यासमोर आहे. कोर्टात हजर राहण्याकरता मी बंगळुरू ते जोनपूर ४० वेळा जावून आलोय”, असं तो म्हणाला. तसंच, त्याच्यावर त्याच्या सासरांच्या खुनाचाही आरोप करण्यात आला आहे. त्याने १० लाख रुपये हुंडा मागितल्याने सासऱ्यांचा त्या धक्क्यातून जीव गेल्याचा दावा पत्नीकडून करण्यात येतोय. माझ्या पत्नीनेच माझं उत्पन्न ४० लाख आणि नंतर ८० लाख रुपये सांगितलं आहे. मग १० लाखांसाठी पत्नी आणि मुलाला मी सोडेन? माझे सासरे अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यामुळे आमचं लग्नही लवकर झालं. त्यांना हृदयविकार होता. आमच्या लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला होता”, अशी माहितीही त्याने दिली.

वडिलांचा मृत्यू २०१९ झाला आणि तक्रार तिने २०२२ मध्ये केल्याचंही त्याने म्हटलंय. पुढे त्याने अनैसर्गिक लैंगिक संबंधावरून त्याच्यावर झालेल्या आरोपांवर खुलासा केला आहे. माझ्या पत्नीकडे कणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत. अनैसर्गिक लैंगिक संबंधाची गोष्ट तर दूर नैसर्गिंक संबंधही आम्ही सहा महिने ठेवले नव्हते. कारण, ती चार पाच दिवस अंघोळ करत नाही”, असे अनेक गंभीर आरोप त्याने केले.

Story img Loader