एकीकडे उत्तरेच्या वाऱ्यांनी संपूर्ण भारत देश ‘गारेगार’ झाला असताना, ऑस्ट्रेलियामध्ये मात्र अत्यंत खडतर आणि कडकडणाऱ्या तापमानाचा कहर सुरू झाला आहे. येथील तापमान इतके वाढत चालले आहे की, हवामान खात्याला आपली तापमान मोजण्याची यंत्रणा आणखी सक्षम करावी लागत आहे.
उच्च तापमान दर्शविण्यासाठी संपूर्ण देशातील हवामान खात्याने वेगळी रंगयंत्रणा तयार केली आहे. येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियामधील तापमान ५० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. चढय़ा तापमानामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भीषण स्थिती निर्माण झाली असून वणव्यामुळे हजारो घरांना धोका निर्माण झाला आहे. मोठय़ा संख्येने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत तापमान आधीचे सर्व विक्रम मोडून वर जाणार असल्याची भीती हवामान खात्याचे प्रमुख डेव्हिड जोन्स यांनी स्पष्ट केले. ५२ ते ५४ हे तापमान दर्शविण्यासाठी हवामान खात्याने गुलाबी रंग निवडला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियामधील तापमान ५० अंशाइतके फार थोडय़ा वेळा झाले होते. १९६० साली दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये ५०.७ अंश इतकी विक्रमी नोंद झाली होती. यंदा तापमान उच्चांकी असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा