भारतात कायम असणारी अतिरेक्यांच्या हल्ल्याची दहशत, कायदा कुव्यवस्था, गुन्हेगारी आणि रस्ते अपघातांची आघाडी या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने भारतात पर्यटन करणाऱ्या आपल्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. भारतात फिरताना अतिदक्षता पाळावी, असे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या नव्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
काय आहे निवेदन?
भारतातील रस्त्यांवर सदैव होणारे अपघात, गुन्हेगारीचा वाढता आलेख आणि दहशतवादी हल्ल्यांची टांगती भीती या पाश्र्वभूमीवर येथे प्रवास करताना अतिदक्षता बाळगा. नवी दिल्ली, मुंबई आणि भारतातील महत्त्वपूर्ण शहरांतील सार्वजनिक स्थळे ही हल्ल्यांची अथवा बडय़ा अपघातांची लक्ष्य ठरू शकतात. धार्मिक स्थळे, सण-समारंभांच्या सुटय़ांचे दिवस हे समाजकंटक व दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी उपयुक्त असल्याचा इतिहास आहे. १३ मार्च रोजी अशाच प्रकारे श्रीनगर येथील पोलीस कॅम्पवर हल्ला झाला आहे. जर तुम्ही श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी असाल, तर स्थानिक अधिकारी आणि माध्यमे यांनी दिलेल्या सूचनांचा आधार घेऊनच पर्यटन करणे इष्ट होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवे काय?
उत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन सल्ला पूर्वीसारखाच कायम ठेवत ऑस्ट्रेलियाने ईशान्य भागातील पर्यटनाबाबत अतिदक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. आसाम, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांमध्ये दरोडा, अपहरण, खंडणी, दहशतवादी कारवाया आदींबाबतचा इशारा नागरिकांना दिला आहे. जम्मू- काश्मीरमधील संवेदनशील भागात शक्यतो प्रवास टाळा, असेही निवेदनात म्हटले आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia updates travel advisory to its citizens visiting india