भारतातील निवडणूक कव्हर करण्याची परवानगी नाकारून ऑस्ट्रेलिअन पत्रकार अवनी डायसला भारत सोडण्यास भाग पाडले असल्याचा आरोप अवनीने केला आहे. मात्र हा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा आणि खोडकर आहे, असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी असलेल्या अवनी डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडला. डायसने आरोप केला होता की तिला सरकारकडून नियमित व्हिसाची मुदतवाढ नाकारली जाईल असे सांगण्यात आले होते. तिला परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने फोनवर या निर्णयाची माहिती दिली होती.तर, तिने व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितल. परंतु, तिच्या विनंतीनुसार तिला आश्वासन देण्यात आले की सार्वत्रिक निवडणुकांच्या कव्हरेजसाठी तिचा व्हिसा वाढविला जाण्याची शक्यता आहे.

mumbai 155 police inspectors transferred before assembly elections have returned
पोलीस निरीक्षक मुंबईत परतले, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेर झाली होती बदली
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
rbi Sanjay Malhotra
‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Supreme Court
Supreme Court : बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांच्या वक्तव्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल; मागवली माहिती

डायसचा पूर्वीचा व्हिसा २० एप्रिलपर्यंत वैध होता आणि तिने १८ एप्रिलला व्हिसाची फी भरली होती. त्याच दिवशी तिचा व्हिसा जून अखेरपर्यंत वाढवण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले. परंतु, डायसने २० एप्रिल रोजी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. भारत सोडण्यापूर्वी तिच्या वैध व्हिसा होता, तसंच तिच्या व्हिसाची मर्यादा मंजूरही झाली होती. निवडणुका कव्हर करण्यास परवानगी नसल्याबद्दलचा तिचा मुद्दा देखील वस्तुस्थितीनुसार चुकीचा आहे, असं सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे.

व्हिसाधारक पत्रकारांना भारतातील निवडणूक कव्हर करण्याची परवानगी आहे. फक्त हे पत्रकार मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रावर वैध अधिकार पत्रे घेतल्याशिवाय प्रवेश करू शकत नाहीत. तथापि, व्हिसाच्या मुदतवाढीची प्रक्रिया सुरू असताना त्यावर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही.

Story img Loader