ऑस्ट्रेलियात इसिसकडून होणारा संभाव्य हल्ला टाळण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी सिडनीत दोनजणांना अटक केली आहे. पंतप्रधान टोनी अबॉट यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती पण पोलिसांच्या सतर्कतेने तो टळला. असे असले तरी पूर्वीपेक्षा भयानक हल्ले होऊ शकतात असा सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला आहे.
उमर अल कुतोबी (२४), इराक व मोहमंद कियाद (२५), कुवेत या दोघांना न्यू साऊथ वेल्स येथे पोलिसांनी पश्चिम सिडनी येथील फेअरफील्ड उपनगरात अटक केली. ते हल्ल्याची तयारी करीत असल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी छाप्यात शिकारीचा चाकू म्हणजे मॅशेट व इस्लामिक स्टेटचा ध्वज, एक व्यक्ती हल्ल्याबाबत बोलत असल्याची व्हिडिओ जप्त केली.  हल्लेखोरांपैकी एकजण बोलताना या व्हिडिओत दिसत आहे. हल्ल्यात कुणाचा तरी शिरच्छेद केला जाणार होता का असे विचारले असता त्याबाबत माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान टोनी अबॉट यांनी सांगितले की, सिडनीत झाला होता त्यापेक्षाही भयानक हल्ले होऊ शकतात. इसिसकडून असे हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे असे त्यांनी सांगितले. इस्लामिक स्टेट विरुद्धच्या लढय़ात ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा मोठा भागीदार असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता जास्त असल्याचा इशारा सप्टेंबरपासूनच दिला गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा