लंडन : ब्रिटीश लेखिका समांथा हार्वे यांना ‘ऑर्बिटल’ कादंबरीला २०२४चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. ‘ऑर्बिटल’ ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे. यंदा पुरस्कारासाठी विचार झालेल्या लेखकांमध्ये महिलांचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरस्काराची रक्कम ५० हजार पौंड इतकी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कादंबरीच्या कथानकाचा संपूर्ण कालावधी २४ तास आहे आणि तिच्या पृष्ठांची संख्या केवळ १३६ इतकी आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित असलेली ही कादंबरी यंदा ब्रिटनमधील सर्वोच्च खपाचे पुस्तक ठरले आहे. हे अंतराळवीर पृथ्वीवरील १६ सूर्योदय आणि सूर्यास्ताचे निरीक्षण करतात. या कालावधीत ते विविध खंडांवर मार्गक्रमण करतात आणि विविध ऋतू त्यांना पाहायला मिळतात.

हेही वाचा >>> ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया

लंडन शहरातील ओल्ड बिलिंग्जगेट येथे मंगळवारी संध्याकाळी एका समारंभात हार्वे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी ‘ऑर्बिटल’चे वर्णन छोटेखानी आणि तरीही विस्तृत व सुरेख असे करण्यात आले. याद्वारे लेखिकेने प्रत्येक मानवी जीवनाचे स्वतंत्र आणि एकत्रित मूल्यांचा विचार केल्याचे परीक्षकांनी म्हटले आहे. तर हार्वे म्हणाल्या की, पृथ्वीच्या विरोधात नव्हे तर बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकाला हे पारितोषिक समर्पित आहे. ‘ऑर्बिटल’ हे बुकर पारितोषिक जिंकणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे छोटे पुस्तक आहे. परीक्षकांमध्ये ब्रिटिश भारतीय संगीतकार नितीन साहनी, कादंबरीकार सारा कॉलिन्स, ‘द गार्डियन’चे फिक्शन संपादक जस्टिन जॉर्डन आणि चिनी अमेरिकी लेखक-प्राध्यापक यियुन ली यांचा समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel zws