अचानक झालेल्या प्रचंड हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिमकडे कोसळून झालेल्या अपघातांत आतापर्यंत सुमारे १० जण ठार झाले, तर तब्बल १०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल़े मृतांमध्ये दोन लष्करी जवानांचाही समावेश आह़े या हिमप्रपातामुळे येथील सुमारे १५० वास्तू उद्ध्वस्त झाल्या आहेत़
हिमवृष्टीमुळे या काश्मीर खोऱ्यातील सर्व रस्ते, तसेच वायूमार्गही उपयोगशून्य झाले आहेत़ त्यामुळे प्रपातात अडकलेल्या किंवा जखमी अवस्थेत असलेल्यांच्या साहाय्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हेलिकॉप्टर तैनात करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत़ दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनामुळे तीन मृत्यू आणि आठ जण जखमी झाले आहेत़ या भागातील मदतकार्य उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू आह़े जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांच्या जीवितास कोणताही धोका नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आह़े याच भागातील पैसेरण- डेग्डुन गावात बुधवारी पहाटे दोन घरांवर हिमकडे कोसळून तीन जण ठार झाल़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाख भागात कारगीर क्षेत्रात लष्करी तळाजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे दोन लष्करी जवान ठार झाले आहेत़ नाईक विजय प्रसाद आणि धर्मिदर सिंग अशी ‘८२ फिल्ड रेजिमेंट’च्या मृत जवानांची नावे आहेत़ दोघांचेही मृतदेह सापडले आहेत़ काझीगंद भागातील मिमिमाग भागतही घराचा भाग कोसळून ४८ वर्षीय महिला ठार झाली़ तर कारगिल भागात दगड खाणीवर हिमपात होऊन तीन नेपाळी कामगार ठार झाले आहेत़
पंजाबला अवकाळी पावसाचा तडाखा
चंदीगढ : पंजाबमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अमृतसर जिल्ह्य़ातील पिकांना सर्वात जास्त तडाखा बसला असून, त्यामुळे संपूर्ण राज्यातील सुमारे पाच ते सात टक्के पिकांची हानी झाली आहे.
अमृतसर जिल्ह्य़ातील सुमारे २५ टक्के पिके अवकाळी पावसामुळे नष्ट झाली असून या जिल्ह्य़ात सर्वाधिक हानी झाल्याचे राज्य सरकारच्या कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले आहे.
पाऊस, गारपीट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामध्ये गहू, टोमॅटो आणि विविध भाज्यांचाही समावेश आहे. अमृतसरमधील १० हजार हेक्टर जमिनीवरील शेतीला या पावसाचा फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.
गुरुदासपूर, कपूरथळा, पठाणकोट, लुधियाना, पटियाळा, मनसा, बर्नाला आदी जिल्ह्य़ांमधील पिकेही पावसामुळे धोक्यात आली असून, शेजारच्या हरयाणा राज्यातील पिकेही पावसामुळे धोक्यात आली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा