सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिल पर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली. सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील काय निर्णय होईल याकडे आमचं लक्ष आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी सिव्हिल एव्हिएशनकडूनही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. विमान कंपन्या १४ एप्रिल नंतर कोणत्याही तारखेची तिकिट विक्री सुरू करू शकतात. २५ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. तो १४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे, असं सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितलं होतं.

वेतन कपातीला वैमानिकांचा विरोध
दरम्यान, शुक्रवारी एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटनेनं वैमानिकांच्या वेतनात करण्यात येणाऱ्या १० टक्क्यांच्या कपातीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय अयोग्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्याचीही आठवण करून दिली. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करू नये या पंतप्रधानांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली.

सीएमडींना पत्र
एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांनी कंपनीच्या सीएमडींना एक पत्र पाठवलं आहे. भत्त्यांमध्ये १० टक्क्यांच्या कपातीच्या निर्णयानं मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह आणि संचालकांनी स्वत:ला वाचवलं आहे. त्यांचे भत्ते कमा आहेत. आम्ही हा निर्णय स्वीकारत नाही, असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aviation company air india no ticket booking till 30th april national international flight coronavirus jud