Awami League Leaders Murder : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसाचारात आणि राजकीय अराजकतेत अवामी लीगच्या २० नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह सापडले आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातून पलायन केले. यामुळे सातखीरा येथे हल्ला आणि हिंसाचार अधिक उफाळला. यात १० मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतप्त आंदोलनकर्त्यांनी अवामी लीगच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करून लुटमारही (Awami League Leaders) केल्याचं वृत्त बांगालादेशातील ढाका ट्रिब्युनने दिलं आहे. सातखीरा सदर आणि श्यामनगर पोलीस ठाण्यातही जाळपोळ आणि लुटमार झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. तर केमिल्लामध्ये जवमाच्या हल्ल्यात ११ जण ठार झाले आहेत. अशोकतळा येथील माजी नगरसेवक मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घरालाही आग लावण्यात आली होती. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय.

हेही वाचा >> Muhammad Yunus : ठरलं! नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस होणार बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख

तर, नाटोर-२ मतदारसंघाचे खासदार शफीकुल इस्लाम शिमुल यांच्या घराला संतप्त जमावाने लावलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जन्नती पॅलेस नावाच्या खासदारांच्या घराच्या अनेक खोल्या, बाल्कनी आणि छतावरही मृतदेह आढळून आले. साक्षीदार आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यांनुसार शेख हसीना यांच्या राजीनाम्याची बातमी समजल्यानंतर संतप्त जमावाने शफीकुल यांच्या घराला आग लावली. घराशेजारीच असलेल्या त्यांच्या धाकट्या भावाची पाच मजली इमारत आणि खासादारंचे जुने घरही पेटवण्यात आले. तर, फेणीमध्ये स्थानिक लोकांनी जुबा लीगच्या दोन नेत्यांचे मृतदेह बाहेर काढले. (Awami League Leaders)

दि टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, जोशोर जिल्ह्यातील जिल्हा अवामी लीगचे सरिचटणीस शाहिन चक्कलदार यांच्या मालकीच्या जबीर इंटरनॅशनल हॉटेलला जवामाने आग लावल्याने तब्बल २४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका इंडोनेशियन नागरिकाचाही समावेश आहे. (Awami League Leaders)

तसंच, बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांनी ढाका सोडल्यानंतर काही तासांनी संतप्त आंदोलकांनी राजधानी शहरातील अवामी लीगचे कार्यालय पेटवले होते. ढाका येथील शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे माजी अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याचीही जमावाने तोडफोड केली होती.

हेही वाचा >> Sheikh Hasina Conflict : १५ वर्षांची सत्ता ४५ मिनिटांत कशी गेली? शेख हसीना यांच्या निवासस्थानी नाट्यमय घडामोडी; दिशाहीन झुंडीचा नेमका परिणाम काय?

बेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस होणार बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी तसेच तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असल्याचे सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awami league leaders bodies found in house after sheikh hasina left country sgk