संगीत-नाटय़ क्षेत्रात मानाचा समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने महाराष्ट्रातील अश्विनी भिडे-देशपांडे आणि नाथ नेरळकर यांना गौरविण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात वितरण सोहळा संपन्न झाला.
गोव्यातील तुलसीदास बोरकर आणि नाटय़ अभिनेते रामदास कदम यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याखेरीज नयन घोष (तबला), रोणु मुजुमदार (बासरी), आर. संथगोपालन, थुरूवालापुथुर टी. ए. कालियामूर्ती, सुकन्या रामगोपाल, आर्याम्बथ जनार्दनम, उमा डोग्रा, अमुसाना देवी, सुधाकर साहू, नवतेज सिंह जोहर यांना गौरविण्यात आले. नाटय़ क्षेत्रातील असगर वजाहत, सूर्या मोहन कुलश्रेष्ठा, अमोद भट, मंजुनाथ भागवत, अमरदास माणिकपुरी तर लोककलेतील योगदानासाठी पुरण शाह, के. केशवासामी, रेबकांत महंता यांचा सन्मान करण्यात आला. संगीत नाटक अकादमी रत्न प्राप्त कलाकारांना तीन लाख रोख देण्यात येते.

Story img Loader