रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं एक भाषण सध्या व्हायरल होत आहे. या भाषणादरम्यान कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. सर्वांनी केवळ शांतता राखली. तर पुतिन मात्र भाषण संपल्यानंतरही तसेच उभे राहिले होते. कोणीच टाळ्या वाजवत नाहीये हे पाहून अखेर ते निघून गेले. तसेच लोकांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ही घटना ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये १७ नवनियुक्त परदेशी राजदूतांना राजनैतिक प्रमाणपत्र देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान घडली. रशियाचे अध्यक्ष पुतिन नवनियुक्त अधिकाऱ्यांना संबोधित करत होते.

युक्रेनच्या अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. गेराश्चेन्को यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, क्रेमलिनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राजदूतांना प्रमाणपत्रे प्रदान करण्याच्या एका समारंभात पुतिन यांच्या भाषणाच्या शेवटी कोणीही त्यांचं कौतुक केलं नाही. पुतिन त्यांचं भाषण संपल्यावर टाळ्यांची प्रतीक्षा करत होते. परंतु कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Dhananjay Munde Pankaja Munde
Dhananjay Munde : “बहीण-भावावरील जनतेचा विश्वास उडाला”, शिंदे गटाच्या माजी खासदाराकडून धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan On Congress
Girish Mahajan : काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप? गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले, “अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी…”

हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”

पुतिन यांच्या भाषणानंतर सभागृहात शांतता

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भाषण संपल्यावर पुतिन थोडं हसले. तसेच नवनियुक्त अधिकाऱ्यांना जाण्यापूर्वी ‘ऑल द बेस्ट’ असं म्हणाले, परंतु सर्व अधिकारी केवळ शांत होते. कोणीही काही बोललं नाही, टाळ्या वाजवल्या नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. भाषणात पुतिन यांनी अमेरिका आणि युरोपीय संघांच्या राजदूतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, युक्रेन हल्ल्यानंतर मॉस्कोशी संबंध बिघडण्यास हे राजदूतच जबाबदार होते.

Story img Loader