अयोध्येत राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. रामलल्लाच्या दोन मूर्ती असणार आहेत. यातल्या एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार छोट्या मंदिरात जी मूर्ती ठेवण्यात आली आहे त्या मूर्तीची आणि मोठ्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा एकत्रच होणार आहे. नवी मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाणार आहे. या मूर्तीला ‘अचल’ मूर्ती असं म्हटलं जाईल. तर जी छोटी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्सव मूर्तीचं काय होणार?

उत्सव मूर्ती देशातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर ही मूर्ती मंदिरातल्या मोठ्या मूर्तीच्या शेजारी गाभाऱ्यातच ठेवण्यात येईल. मंदिरात ठेवण्यात येणारी मोठी मूर्ती ही गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन मूर्तीकारांनी तयार केली आहे. २२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येला जाणार आहेत. तिथे अयोध्या धाम या रेल्वे स्टेशनचं आणि श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी एक सभाही होणार आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत. अयोध्या विमानतळ ते रेल्वे स्टेशन असा एक रोड शोही आयोजित केला जाणार आहे अशी माहिती अयोध्येचे आयुक्त गौरव दयाळ यांनी माध्यमांना दिली.

एक दिया राम के नाम मोहीम

१ जानेवारीपासून एक दीया राम के नाम ही मोहीमही चालवली जाणार आहे. ही मोहीम १०० दिवस चालवली जाणार आहे. या मोहिमेत भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. एक दिया राम के नाम ही मोहीम देशभरात चालवली जाणार आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी अनुष्ठान आणि पूजा एक आठवडा आधी म्हणजेच १६ जानेवारीपासून सुरु केली जाणार आहे. गणेश शास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पूजारी असणार आहेत. अयोध्येत या निमित्ताने भाविकांची गर्दी झाली आहे. तसंच या ठिकाणी बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya a new idol installed in sanctum ram mandir what will happen to old idol of ramlala know scj
Show comments