राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी आज अयोध्येत हिंदुत्ववादी संघटनांनी ठाण मांडले आहे. विश्व हिंदू परिषदेसह आरएसएसच्या इतर संलग्न संघटनांकडून येथे धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही धर्मसभा असणार आहे. यामध्ये सुमारे ३ लाख रामभक्त सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सहपरिवार अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. हजारो शिवसैनिकही येथे उपस्थित आहेत.
Live Blog
Live Blog
Highlights
अयोध्येत होत असलेल्या धर्मसभेत स्वामी रामभद्राचार्यांनी मोठे विधान केले आहे. राम मंदिराबाबत सरकार ११ डिसेंबर रोजी मोठी घोषणा करेल असे भाकित त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात राम मंदिराबाबत केलेल्या विधानानंतर लगेचच स्वामींनी हे विधान केले आहे. मोदींनी काँग्रेसवर राम मंदिराची उभारणी करताना अडचणी निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे. तर विहिंप नेते चंपत राय यांनी या धर्मसभेनंतर आता कोणतीही सभा होणार नाही तर, थेट मंदिराची निर्मिती होईल असे म्हटले आहे.
अयोध्येत होत असलेल्या धर्मसभेवर पोलीस अधिकारी आनंदकुमार यांनी सांगितले की, आत्तापर्यंत येथे ७५ हजार लोकांची उपस्थिती आहे. शहरात कुठल्याही प्रकारे अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. सकाळपासून आत्तापर्यंत २७,००० हजार लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे.
अयोध्येतील धर्मसभेत विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, राम मंदिरासाठी आम्हाला जमीनीचे तुकडे मंजूर नाही. सुन्नी वक्फ बोर्डाने आपला खटला मागे घ्यायला हवा. आम्हाला इथली संपूर्ण जमीन हवी आहे.
विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या या धर्मसभेच्या कार्यक्रमस्थळी तृतीयपंथी देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी लवकरात लवकर राम मंदिर उभारण्यात यावे अशी मागणी केली. यावर आता आणखी वाट पाहता येणार नाही, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, येथे जमलेल्या रामभक्तांचे मुस्लिम समुदायानेही स्वागत केले आहे. यावेळी मुस्लिम मंचाशी जोडलेल्या लोकांनी धर्मसभा मार्गावर रामभक्तांवर फुलांचा वर्षाव केला. यावेळी बबलू खान रामभक्तांचे स्वागत करीत आहेत.
अयोध्येत वाढत्या गर्दीवर बाबरी प्रकरणाचे पक्षकार इकबाल अन्सारी यांनी सुरक्षा व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले की, जर १९९२मध्ये याप्रकारे सुरक्षा व्यवस्था असती तर बाबरीचा विध्वंस झाला नसता.
धर्मसभेसाठी येणाऱ्या राम भक्तांवर कार्यक्रमस्थळी फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. यावेळी भक्तांकडून 'हर घर भगवा छाएगा, रामराज्य फिर आयेगा' च्या घोषणा देण्यात येत आहेत. तसेच 'तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का' अशाही काही घोषणा इथे देण्यात येत आहेत. यावेळी काही तरुण मंडळी ही गर्दी टिपताना सेल्फी घेताना दिसत आहेत.
शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसंसदेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
We’ve made all the arrangements for the programme (VHP’s dharma sansad). We’ve allotted spaces for parking, bypass is running smoothly & we’ll ensure it stays like that. ‘Darshan’ will be from the usual routes. We’ll do everything in an organized way: DIG Ayodhya, Omkar Singh pic.twitter.com/igqgu5WgCR
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
विश्व हिंदू परिषदेकडून नागपूरमधील हनुमान नगर परिसरात हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बंगळूरूमध्येही हुंकार रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान, नागपूरमधील रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत दाखल झाले आहेत. हुंकार रॅलीसाठीही मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या रॅलीच्या आयोजनाला भाजपाचाही पाठींबा असल्याचे सुत्रांकडून कळते.
शरयू नदीच्या काठी उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून रामाची १५१ मीटर उंच मुर्ती उभारण्यात येणार आहे. पाच जणांनी यासाठी मुर्ती साकारली होती, यांपैकी मराठमोळ्या राम सुतार यांनी साकारलेल्या मुर्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत माहिती दिल्याचे माध्यमांतील वृत्तातून कळते.
श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा हॉटेलवर परतले आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray returns to the hotel after visiting the Ram Lalla temple earlier today. pic.twitter.com/Py0I4yPdKd
— ANI UP (@ANINewsUP) November 25, 2018
अयोध्येतील दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हॉटेलवरुन मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा अदित्य ठाकरे यांच्यासह रामजन्मभूमीच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सहपरिवार त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. केवळ दहा मिनिटांच्या या कालावधीनंतर ते पुन्हा पंचवटी हॉटेलकडे रवाना झाले. त्यानंतर काही वेळातच ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत.
असंख्य हिंदूच्या राम मंदिर निर्माण विषयीच्या जनभावना मनाशी घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रभू राम लला जीं चे दर्शन घेतले.
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) November 25, 2018
पक्षप्रमुखांच्या अयोध्या यात्रेने हिंदूंच्या राम मंदिर होण्याच्या आशेला नवचैतन्य मिळाले.#ThackerayinAyodhya
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात येत होते. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सुत्रांकडून कळते. मात्र, सहपरिवार रामल्लाचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय भुमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या भाजपा-शिवसेना युतीबाबत प्रश्नचिन्ह आहे. यावर उद्धव ठाकरे काही बोलतात का, सरकारला ते काय इशारा देतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह रामजन्मभूमीच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही वेळातच येथे पोहोचल्यानंतर ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, हजारो शिवसैनिकांनी रामजन्मभूमीच्या परिसरात मोठी गर्दी केली आहे. येथे पोलिसांचा कडेकोड बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
राम मंदिराच्या निर्माणाची मागणी घेऊन विश्व हिंदू परिषद आणि शिवसेनेने अयोध्येत दोन स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. यापार्श्वभूमीवर शहरातील वातावरण तणावपूर्ण असून येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले आहे.
Visuals from Ayodhya. VHP and Shiv Sena are organising separate events in the city today over the matter of #RamTemple. pic.twitter.com/kKKFBhaTR0