अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर उभं राहिलं आहे. या मंदिराचं बांधकाम सुरु आहे. या मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंदिरात रामाच्या दर्शनासाठी पाच लाख भाविक आले होते. तसंच आणखी एक गोष्ट घडली. राम मंदिराच्या गाभाऱ्यात एक माकड आलं. लोकांना आणि सुरक्षा रक्षकांना वाटलं की आधी वाटलं की ते माकड रामाच्या मूर्तीला काही करणार तर नाही ना? मात्र हे माकड रामाच्या मूर्तीसमोर थोडावेळ बसलं. त्यानंतर मूर्ती पाहिली आणि ते तिथून निघून गेलं. ज्यानंतर हनुमानजी आये हैं.. अशी चर्चा सुरु झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे मंदिर प्रतिष्ठानने?

रामाच्या मंदिरात माकड येण्याबाबतची जी घटना आहे त्याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. “आज रामजन्मभूमी मंदिरात एक सुंदर घटना घडली. संध्याकाळी ५.५० च्या सुमारास एक माकड दक्षिण द्वारातून गाभाऱ्यात आलं. त्यानंतर हे माकड उत्सव मूर्तीच्या जवळ पोहचलं. सुरक्षारक्षकांनी माकड मंदिरात शिरल्याचं पाहिलं आणि ते धावले. त्यांना वाटलं की हे माकड मूर्तीला काही करणार तर नाही ना? मात्र हे माकड काही वेळ मूर्तीसमोर बसलं आणि उत्तर दरवाजातून निघून गेलं. त्या माकडाने काहीही नुकसान केलं नाही. सुरक्षा रक्षकांमध्ये चर्चा होऊ लागली की रामरायाचं दर्शन घेण्यासाठी हनुमानच आले आहेत. अशी पोस्ट मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.

हे पण वाचा- प्रभू रामाची मूर्ती कोरली आहे कृष्ण शिळेत! कृष्ण शिळा म्हणजे काय? काय आहेत वैशिष्ट्ये?

माकड जेव्हा रामाच्या गाभाऱ्यातून निघून गेलं तेव्हा हीच चर्चा सुरु राहिली की हनुमानजीच दर्शन घेऊन गेले. ज्या ज्या भाविकांनी हे दृश्य पाहिलं ते स्वतःला भाग्यवान समजत आहेत. आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण होता की आम्ही रामाची मूर्ती आणि हनुमान यांचं दर्शन घेतलं. वाराणसीहून अयोध्येत दर्शनासाठी आलेल्या अमन विश्वकर्मांनी सांगितलं मी हे दृश्य पाहिलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. सुरुवातीला आम्हाला वाटलं की हे पाळीव माकड आहे. मात्र नंतर समजलं की हे माकड रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram mandir when monkey reached the sanctum sanctorum of ramlala even the security personnel were surprised by the sudden incident scj