अयोध्या : अयोध्येमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून रेल्वे स्थानक, राम मंदिराकडे जाणारे रस्ते या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरात उद्भवलेली पूरस्थिती, मंदिराच्या छतातून पाणी गळती होत असल्याचे आरोप, रस्त्यांना पडलेले खड्डे, रेल्वे स्थानकाच्या भिंतीचा पडलेला काही भाग या बाबींमुळे तिथे झालेल्या विकासकामांच्या दर्जावर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अयोध्येच्या विकास प्रकल्पांचा भाग म्हणून नव्याने तयार केलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसले. अयोध्या रेल्वे स्थानकाच्या कुंपणाच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्यापाठोपाठ अयोध्येतील नागरिकांनी आपल्या घरात पाणी शिरत असल्याच्या तक्रारी केल्या. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविक रांग लावतात त्या प्रवेशाद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचत आहे.
अयोध्येतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह
मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविक रांग लावतात त्या प्रवेशाद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचत आहे.
Written by वृत्तसंस्था
First published on: 29-06-2024 at 05:59 IST | © The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram path develops potholes after first rain zws