अयोध्या : अयोध्येमध्ये पाऊस सुरू झाल्यापासून रेल्वे स्थानक, राम मंदिराकडे जाणारे रस्ते या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शहरात उद्भवलेली पूरस्थिती, मंदिराच्या छतातून पाणी गळती होत असल्याचे आरोप, रस्त्यांना पडलेले खड्डे, रेल्वे स्थानकाच्या भिंतीचा पडलेला काही भाग या बाबींमुळे तिथे झालेल्या विकासकामांच्या दर्जावर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अयोध्येच्या विकास प्रकल्पांचा भाग म्हणून नव्याने तयार केलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसले. अयोध्या रेल्वे स्थानकाच्या कुंपणाच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्यापाठोपाठ अयोध्येतील नागरिकांनी आपल्या घरात पाणी शिरत असल्याच्या तक्रारी केल्या. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविक रांग लावतात त्या प्रवेशाद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा