अयोध्येत नव्यानं बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, केंद्र आणि योगी सरकारकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश केंद्र सरकारनं जारी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेता, केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं, अयोध्येतील श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सोहळ्यात सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत आहे. त्यानुसार, २२ जानेवारीला देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस अर्थात दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद असतील.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आता तुमची पुढची भूमिका काय? छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “निर्णय घेण्यासाठी माझी…”

हेही वाचा : पाच वर्षांच्या बालरुपात रामराया अयोध्येच्या मंदिरात होणार विराजमान, ‘ही’ आहेत मूर्तीची वैशिष्ट्ये

प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा २२ जानेवारीला दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी संबोधित करणार आहेत.

हेही वाचा : अयोध्येत पोहचले ‘रामायण’ मालिकेतील ‘राम’, ‘लक्ष्मण’ आणि ‘सीता’, स्वागताचा व्हिडीओ व्हायरल

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी उत्तर प्रदेशच्या पखावाजापासून तमिळनाडूच्या मृदंगापर्यंत देशभरातील विविध शास्त्रीय वाद्यांचे वादन केले जाणार आहे. या वादनासाठी भारताच्या विविध भागांतील संगीतकारांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातून बासरी आणि ढोल, कर्नाटकातून वीणा, महाराष्ट्रातून सुंदरी, पंजाबमधून अलगूज, मध्य प्रदेशातून संतूर, दिल्लीतून सनई, बिहारमधून पखवाज, ओडिशाचा मृदंग, मणिपूरहून पुंग, आसामचे नागडा आणि काली, छत्तीसगडचा तंबोरा, पश्चिम बंगालचे श्रीखोल आणि सरोद, आंध्र प्रदेशचे घाटम, झारखंडची सतार, तमिळनाडूचा नादस्वर आणि मृदंग, उत्तराखंडचे हुडका आणि राजस्थानमधील रावणहाट आदी वाद्यांचे वादन होणार आहे.

Story img Loader