Ram Temple Inauguration : अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे की प्रशासनाला शहरात पंचतारांकित हॉटेल्स उभारण्याची १०० निवेदनं आली आहेत. एक काळ असा होता की या भागात काहीही व्यवस्था नव्हती. काही वर्षांपूर्वी हॉटेल्सही नव्हते. राम मंदिर निर्मितीनंतर आणि २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानंतर पर्यटन व्यवसायाला उभारी मिळणार आहे. २२ जानेवारीनंतर हे मंदिर सगळ्या लोकांसाठी खुलं होणार आहे. सीतामातेने शाप मागे घेतल्याने ही प्रगती झाल्याचं दिसतं आहे असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा हे अयोध्येच्या शाही कुटुंबाचे सदस्य आहेत. या कुटुंबाचा इतिहास राजा दर्शन सिंह यांच्यापासूनचा आहे. अयोध्येत बिमलेंद्र मिश्रा यांना राजे म्हटलं जातं आहे. १९ व्या शतकात दर्शन सिंह यांचं राज्य होतं. तर बिमलेंद्र मिश्रा हे आंदोलनात सहभागी झाले होते.

काय म्हणाले बिमलेंद्र मिश्रा?

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अयोध्येत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अयोध्येत व्यवस्थित हॉटेल्स नव्हती. आता या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स सुरु करण्यासाठी १०० निविदा आल्या आहेत. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी मला ही बाब सांगितली आहे.” असं बिमलेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.

अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रा म्हणाले की आता शहर स्मार्ट सिटी होतं आहे. मला वाटतं आहे की पुढची पाच वर्षे लोक फक्त दर्शनासाठी नाही तर अयोध्या पाहण्यासाठी येतील. अयोध्येला पवित्र नगरीचं स्वरुप आलं आहे. सीतामातेने जो शाप दिला होता तो तिने मागे घेतला आहे. त्यामुळेच आता अयोध्येची प्रगती होते आहे असंही त्यांनी म्हटलं.

स्थानिकांच्या मान्यतेनुसार, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी जेव्हा सीतेचा त्याग केला तेव्हा सीतामातेने अयोध्येला शाप दिला. लोक हे देखील मानतात की या शापामुळेच अयोध्येचा विकास झाला नाही. आता बिमलेंद्र मिश्रा यांनी सीतामातेने शाप मागे घेतला आहे म्हणून इथे विकास होऊ लागल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya ram temple ram temple inauguration sita mata has withdrawn her curse king of ayodhya on development scj
Show comments