२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सहा महिने पूर्ण झाले. अशातच रामलल्लाची मूर्ती ज्या गाभाऱ्यात ठेवली आहे तिथे पहिल्या पावसातच गळती सुरु झाली आहे. याबाबत

सत्येंद्र दास काय म्हणाले?

“जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथेच छताला गळती लागली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामानंतर पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. फक्त राम मंदिराच्या गाभाऱ्यातच नाही तर मंदिराच्या इतर ठिकाणी देखील गळती होत आहे. त्यामुळे या गळतीची चौकशी होणं अपेक्षित आहे” असं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.

Chandrapur city Rain of Rs 200 notes morning aam aadmi party BJP election campaign
आश्चर्य! चंद्रपूर शहरात पहाटे चक्क २०० रूपयांच्या नोटांचा पाऊस…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
Abdul Sattar
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!

“राम मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचत असल्याचे सांगितले. जिथे प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान आहे, तिथे पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. पहिल्या पावसामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साठलं होतं. त्यामुळे बांधकामावेळी नेमकी काय चूक झाली. याची माहिती घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. तसेच यावर उपाययोजना न केल्यास मंदिरात पूजा करणे कठीण होईल, असेही त्यांनी सांगितलं. आता या सगळ्याबाबत नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दुसरीकडे सत्येंद्र दास यांच्या वक्तव्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी हे पाणी नेमकं का गळतं आहे? गाभाऱ्यात पाणी बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था का नाही? या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

नृपेंद्र मिश्रा यांनी काय म्हटलं आहे?

“मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिलय. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच बांधकाम सुरु आहे, हे यामागे कारण आहे. संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी साठलं आणि मंदिराच्या छतामधून गळती सुरु झाली. दुसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत छत बंद होईल. त्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार नाही” असं नृपेंद्र मिश्रा म्हणाले.

“मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी काढण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नाही. पाणी हातानेच काढावं लागतं. अन्य सर्व मंडपात उतरण आहे. पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे तिथे पाणी जमा होत नाहीय. राम मंदिर निर्माण समिती कोट्यवधी राम भक्तांना आश्वस्त करु इच्छिते की, मंदिर निर्माणात कुठली कमतरता नाहीय. कुठलही दुर्लक्ष झालेलं नाही” असं नृपेंद्र मिश्रा म्हणाले.