बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वाद अद्यापही शमलेला नाही. पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यात दिपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली असल्याने राजकीय नेत्यांसह काही धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता अयोध्येमधील संत परमहंस आचार्य यांनी धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी शाहरुखला जिवंत जाळून टाकण्याची जाहीर धमकीच दिली आहे. तसंच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परमहंस आचार्य हे अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत आहेत. त्यांनी शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला विरोध केला. चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावेळी त्यांनी शाहरुख खानचा उल्लेख ‘जिहादी’ असा केला आहे.

“पठाण चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. आमच्या सनातन धर्मातील लोक सतत याचा विरोध करत आहेत. आज आम्ही शाहरुख खानचं पोस्टर जाळलं आहे. आता मी त्याला शोधत आहे. जर मला तो कुठे सापडला तर त्याला जिवंत जाळून टाकू. जर इतर कोणी जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. या चित्रपटावर बहिष्कार टाका असं मी आवाहन करतो”, असं परमहंस आचार्य म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya seer paramhans acharya says will burn shah rukh alive if i meet him over pathaan film controversy sgy