उत्तर प्रदेशचे शहरविकासमंत्री आझम खान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असभ्य आणि अवमानकारक भाषावापर असल्याने आपली इतरत्र बदली करावी, अशी मागणी आझम खान यांच्या सेवेत असलेल्या सात अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी याबाबत राज्य सरकारकडे दाद मागितली आहे.
खान यांचे खासगी सचिव जीवन सिंह नेगी व विजय बहादूर सिंह आणि सहायक सचिव अवदेश कुमार तिवारी, एम. एम. झा, सर्वेश कुमार मिश्रा, मोहम्मद नईम सिद्दिकी आणि एस.प्रजापती यांनी याबाबत मुख्य सचिवांना बदलीसाठी पत्र पाठवले आहे. आझम खान असभ्य भाषा वापरत असल्याने आमच्यावर ताण येतो. त्यामुळे त्यांच्या समवेत इतर कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड आहे. त्यांना मंत्रिमंडळातून वगळावे किंवा बिनखात्याचे मंत्री ठेवावे, अशी मागणी उत्तर प्रदेश सचिव संघटनेचे अध्यक्ष यादवेंद्र मिश्रा यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना भेटून हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
आझम खान यांच्यावर अरेरावीचा आरोप
उत्तर प्रदेशचे शहरविकासमंत्री आझम खान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. असभ्य आणि अवमानकारक भाषावापर असल्याने आपली इतरत्र बदली करावी,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-10-2013 at 03:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam khan allegate for harassing secretary