जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली तर राज्यातील सर्व भटक्या गायींचा सांभाळ करण्यास आपण तयार असल्याचं विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील रस्त्यांवर भटक्या गुरांच्या संख्येत वाढ झाल्याचे अनेक अहवाल आले आहेत. त्याबाबत बोलताना आझम खान म्हणाले, गायीला आपली माता म्हणणाऱ्यांनी अशाप्रकारे गायीला रस्त्यावर सोडणं संतापजनक आहे. अशा लोकांना दंड व्हायला हवा. जर योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली तर राज्यातील सर्व भटक्या गायींचा सांभाळ करण्यास मी तयार आहे असं आझम खान म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये गोहत्येवरील बंदी महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनला आहे. त्यामुळे भटक्या गायींच्या मुद्द्यावरुन आझम खान यांनी मी सर्व भटक्या गायींचा सांभाळ करण्यास तयार असल्याचा टोमणा आदित्यनाथ यांना मारला आहे. दरम्यान, भटक्या गुरांच्या सांभाळासाठी उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Story img Loader