उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांचा आरोप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे हिंदू संघटनांशी साटेलोटे असल्यामुळेच, एरवी आक्रमकपणे ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उठवणाऱ्या या संघटनांनी बुखारींच्या मुलाच्या हिंदू मुलीशी झालेल्या विवाहाबाबत मौन पाळले असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे वादग्रस्त मंत्री आझम खान यांनी केला आहे.
आझम यांचा मतदारसंघ असलेल्या रामपूरमध्ये गायींची खुलेआम कत्तल होत असून, मंत्र्यांच्या भीतीमुळे त्याविरुद्ध कुणीही आवाज उठवत नाही, असे विधान बुखारी यांनी शुक्रवारी कानपूरमध्ये केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam khan slam bukhari