भारतीय जनता पक्षाच्या बी.वाय.राघवेंद्र आणि शिवकुमार उदासी या दोन खासदारांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याने सोमवारी पक्षाने यांचे निलंबन केले. बी.वाय. राघवेंद्र हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयूरप्पा यांचे तर, शिवकुमार उदासी हे भाजपचे माजी मंत्री सी.एम.उदासी यांचे मुलगे आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन बी.एस.येडीयूरप्पांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई याआधीच करण्यात आली होती. त्यानंतर येडीयूरप्पांनी भाजपतून काढतापाय घेत स्वतंत्र कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली आणि भाजपविरोधात बंड पुकारले. येडीयूरप्पांचे पुत्र राघवेंद्र मात्र भाजपमध्येच होते. परंतु भाजपमधून बाहेर पडलेल्या या माजी मंत्र्यांच्या मुलांनी कर्नाटक जनता पक्षाच्या बाजूने काही कामे केल्याचे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले आणि आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांचे भाजपमधून निलंबन करण्यात आले आहे.
येडीयूरप्पांच्या मुलासह आणखी एका खासदाराची भाजपमधून हकालपट्टी
भारतीय जनता पक्षाच्या बी.वाय.राघवेंद्र आणि शिवकुमार उदासी या दोन खासदारांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याने सोमवारी पक्षाने यांचे निलंबन केले. बी.वाय. राघवेंद्र हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडीयूरप्पा यांचे तर, शिवकुमार उदासी हे भाजपचे माजी मंत्री सी.एम.उदासी यांचे मुलगे आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन बी.एस.येडीयूरप्पांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई याआधीच करण्यात आली होती.
आणखी वाचा
First published on: 09-04-2013 at 11:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: B s yeddyurappa son among 2 mps suspended by bjp