‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कांता प्रसाद यांनी पोलिसात जबाब नोंदवला होता. त्यात अनेक यूट्युबर्स गौरव वासनची माफी मागण्यासाठी दबाव टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मानसिक तणावात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. “कांता प्रसाद यांना त्रास देणाऱ्या यूट्युबर्सची पोलीस चौकशी करत आहेत. ८१ वर्षीय कांता प्रसाद यांची प्रकृती ठिक असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.”, असं डीसीपी अतुल कुमार ठाकुर यांनी सांगितलं आहे.
कांता प्रसाद यांनी गेल्या आठवड्यात कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. ‘धंद्याबाबत कांता प्रसाद यांना चिंता सतावत होती. त्यानंतर वडिलांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या.’, असं कांता प्रसाद यांचा मुलगा करण याने सांगितलं होतं. तर दुसरीकडे कांता प्रसाद यांनी मालवीय नगरमधील नवं हॉटेल बंद केलं आहे. “त्या हॉटेलसाठी महिन्याकाठी १ लाख रुपये खर्च येत होता. त्याचबरोबर मिळकत केवळ ३० हजार रुपये होती. त्यामुळे जुन्या ठिकाणी पुन्हा धंदा सुरु केला.” असं कांता प्रसाद यांच्या पत्नी बदामी देवी यांनी सांगितलं.
क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी, युट्यूबर गौरव वासन याने प्रसाद आणि त्यांची पत्नी यांच्या दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमधील भोजनालयात ग्राहक नसल्याबद्दल बोलत असलेला एक व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यांना मदत केली. पण काही दिवसांनी प्रसाद यांनी वासन विरुद्ध मालवीय नगर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्याने आपल्याला मिळालेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केल होता.