राष्ट्रहितासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले आहे.
आपण नितीशकुमार यांच्यासह, ममता बॅनर्जी आणि नवीन पटनाईक यांना आवाहन करत आहे. भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी आणि भाववाढ रोखायची असेल तर मोदींना पाठिंबा द्यावा, असे आवाहन रामदेवबाबांनी केले. बिहारच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी रामदेवबाबांचे आगमन झाले. त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रात नेतृत्व करण्यात मोदी सक्षम असल्याचा दावा रामदेवबाबांनी केला. आम आदमी पक्षाबाबत त्यांनी फारसे भाष्य केले नाही. जेव्हा राष्ट्रीय राजकारणाची बाब येईल तेव्हा जनता मोदींना साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा