“ओबीसीवाले अपनी ऐसी-तैसी कराएँ” असं विधान बाबा रामदेव यांनी केल्याचा एक व्हिडीओ शनिवारी दिवसभर व्हायरल होत असल्याचं दिसून आलं. या व्हिडीओनंतर #बाबारामदेवमाफ़ी_मांगो असा हॅशटॅगही एक्सवर (ट्विटर) ट्रेंड झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर यासंदर्भात जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारणा केली, तेव्हा बाबा रामदेव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओबीसी नसून ओवेसींबाबत मी बोललो, असा खुलासा केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं. यानंतर आता बाबा रामदेव यांचा हा खुलासा चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं?

एका वाहिनीवर प्रवचनादरम्यान बाबा रामदेव यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. “मेरा पूर्व गोत्र ब्रह्म है. मैं अग्निहोत्री ब्राह्मण हूँ मैं. बोले बाबाजी आप तो ओबीसी हो. ओबीसीवाले ऐसी-तैसी कराए. मैं हूँ अग्निहोत्री ब्राह्मण, मैं हूँ वेदी ब्राह्मण, मैं हूँ द्विवेदी ब्राह्मण, मैं हूँ त्रिवेदी ब्राह्मण और मैं हूँ चतुर्वेदी ब्राह्मण.. चार वेद मैंने पढे है”, असं बाबा रामदेव म्हणताना ऐकू येत आहे. या व्हिडीओच्या सत्यासत्यतेविषयी सोशल मीडियावर कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नसताना आता खुद्द रामदेव बाबा यांनीच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Aishwarya Rai And Abhishek Bachchan attends aaradhya school event
Video : लेकीच्या शाळेत जोडीने पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन! सोबतीला होते ‘बिग बी’; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Muramba
Video: “हिला रमा बनवणं अवघड…”, अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का? ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Rahul Gandhi BJP MP Ruckus
Rahul Gandhi Video : “लाज वाटत नाही का? दादागिरी करता…”; जखमी भाजपा नेत्याला पाहायला गेलेल्या राहुल गांधींना खासदारांनी सुनावलं
varun dhawan on amit shah
“अमित शाह देशाचे हनुमान”, वरुण धवनने गृहमंत्र्यांचं केलं कौतुक अन् विचारला प्रश्न; म्हणाला, “राम आणि रावण…”
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”

काय म्हणाले बाबा रामदेव?

बाबा रामदेव यांनी पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य आणि त्यावरून सध्या चालू असणारा वाद याविषयी भूमिका मांडली. “मी तर असं कुठलं विधान केलं नाही” असं रामदेव बाबा म्हणाले. यावेळी पत्रकारांनी आधी चुकून ओवेसी उल्लेख केला आणि नंतर लगेच ‘ओबीसींबाबत तुम्ही विधान केलं’ अशी विचारणा केली. त्यावर बोलताना बाबा रामदेव यांनी थेट ओवेसींचा एकेरी उल्लेख करत भाष्य केलं. “ओवेसी तर उलट्या डोक्याचा आहेच. त्याच्या बाबतीत काय बोलणार? ओवेसी आणि त्याच्या पूर्वजांचे देशद्रोही विचारच राहिले आहेत. त्याच्याबद्दल कोणताच मुद्दा मी गांभीर्यानं घेत नाही”, असं बाबा रामदेव म्हणाले.

Video: “ओबीसीवाले अपनी ऐसी-तैसी कराएँ, मैं हूँ..”, बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू!

यावेळी पत्रकारांनी ओबीसींबाबत तुम्ही विधान केलं होतं, अशी आठवण करून दिल्यानंतर त्यांनी तो दावा फेटाळून लावला.

इथे पाहा काय म्हणाले होते बाबा रामदेव…

“ओबीसींबाबत मी काहीही चुकीचं बोललेलो नाही”, असं बाबा रामदेव यावेळी म्हणाले. रामदेव बाबा यांनी व्हायरल व्हिडीओमध्ये केलेल्या विधानावरून सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

Story img Loader