Baba Siddique Murder Case Mumbai Crime Branch Arrested Shiv Kumar Gautam : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. ही या प्रकरणातील १७ वी अटक आहे. या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (वय २३) याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. तो कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झालं आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते. पाठोपाठ आता आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून पळून गेलेला आरोपी शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला रविवारी (१० नोव्हेंबर) अटक करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा