रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभरात चिंतायुक्त चर्चा झडताना पाहायला मिळत आहेत. रशिया युक्रेनवरील हल्ले थांबवायला तयार नसताना युक्रेननं देखील लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संयुक्र राष्ट्र, अमेरिका, नाटो या सगळ्यांनी युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशिया कुणाचंही ऐकायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणार्या बाबा वेंगा यांनी कधीकाळी केलेल्या एका भविष्यवाणीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बाबा वेंगा यांनी रशियाविषयी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याविषयी एक भविष्यवाणी केली होती.

एका माहितीनुसार, बाबा वेंगा यांनी ही भविष्यवाणी तब्बल ४३ वर्षापूर्वी केली होती. १९७९ साली अर्थात रशियाचं विघटन होण्याच्याही दशकभर आधी बाबा वेंगा यांनी ेका कार्यक्रमात बोलताना रशिया आणि व्लादिमिर पुतीन यांच्याविषयी ही भविष्यवाणी सांगून ठेवली होती. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भविष्यवाणी काही अंशी खऱ्या ठरल्याचं दिसून आलं आहे. मात्र, तेवढ्याच, किंबहुणा काकणभर जास्तच भविष्यवाणी चुकीच्या ठरल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Navri Mile Hitlarla
पाडवा साजरा करण्यासाठी लीलाने केली युक्ती; टायगरला बोलवताच एजेने…; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

काय म्हणाल्या होत्या बाबा वेंगा?

१९७९ मध्ये बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं, “सगळं काही थिजून जाईल. एखाद्या बर्फाप्रमाणे. फक्त एकच गोष्ट अबाधित राहील. व्लादिमिरचा प्रभाव आणि रशियाचं सामर्थ्य. कुणीही रशियाला थांबवू शकत नाही. इतर सगळ्यांना रशिया आपल्या मार्गातून बाजूला सारेल आणि जगाचा अधिपती म्हणून उदयाला येईल”, असं बाबा वेंगा म्हणाल्या होत्या. ज्या पद्धतीने रशियानं युक्रेनवर हल्ला करून इतर कुणाच्याही दबावाला न जुमानता हल्ले सुरू ठेवले आहेत, त्यावरून आता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे.

Russia-Ukraine War : “आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं”, फ्रान्सचा गंभीर इशारा; UN सदस्य देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीला!

कोण आहेत बाबा वेंगा?

यापूर्वी बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियन तुटण्यासंदर्भात, प्रिंसेस डायनाचा मृत्यू, चर्नोबीलसारख्या घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी स्वत:च्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा या स्वत: अंध होत्या. त्यांना भविष्य आणि औषधी वनस्पती या विषयांमध्ये विशेष रस होता. त्यांचं १२ व्या वर्षांपर्यंत आयुष्य अगदी सर्वसामान्य मुलीसारखं गेलं. मात्र वयाच्या १२ व्या वर्षी एका वादळामध्ये त्यांना कायमचं अंधत्व आलं. त्या जेव्हा वादळानंतर त्यांच्या कुटुंबियांना सापडल्या तेव्हा त्यांचे डोळे शिवल्याप्रमाणे बंद झाले होते.

प्रलय, मोठा ड्रॅगन अन् राक्षस…: २०२० पेक्षा २०२१ अधिक धोक्याचं?; ९/११ चं भाकित करणाऱ्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

दरवर्षी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा

मात्र याच घटनेमुळे बाबा वेंगा यांना दिव्यदृष्टी मिळाल्याचा दावा केला जातो. यानंतर बाबा वेंगा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचा विश्वास येथील स्थानिकांमध्ये निर्माण झाला. बाबा वेंगा या कोणत्याही आजारी व्यक्तींना बऱ्या करु शकतात अशी ख्याती पसरली. बाबा वेंगा यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या मृत्यूसंदर्भातही भाकित केल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार सन ५०७९ मध्ये ब्रम्हांडाचा अंत होणार आहे. बाबा वेंगा यांचं १९९६ साली वयाच्या ८५व्या वर्षी निधन झालं आहे. मात्र, दर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाबा वेंगा यांनी सांगितलेल्या भविष्याची जगभरात चर्चा होताना दिसते.