बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी रविवारी काँग्रेसचा उल्लेख मते खाणारा पक्ष असा केला. काँग्रेसला मत देऊन ते वाया घालविण्यापेक्षा बसपला मते द्या, असे आ्वाहन त्यांनी मतदारांना केले. प्रियंका गांधी यांचा थेट उल्लेख न करता, मायावती म्हणाल्या की, काँग्रेसचा उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या व्यक्तीने एकाच दिवसात घुमजाव करून मुख्यमंत्रीपदाचे अन्य चेहरेही असल्याचे सांगितले आहे. यावरून या पक्षाची उत्तर प्रदेशमधील अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसून येते. त्यांना मते देऊन ती वाया घालवू नका.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगी आदित्यनाथ यांच्यावरही मायावती यांनी टीका केली. योगी ज्या विकासकामांचा उल्लेख करीत आहेत, त्यामध्ये बसपाचे योगदान असल्याचे सांगत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahujan samaj paksha congress vote mention of congress akp