मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची ६ हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक ६ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, आर्मस्ट्राँग यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

हेही वाचा : लालूप्रसाद यादव यांचा मोठा दावा, “ऑगस्ट महिन्यात केंद्रातलं मोदी सरकार कोसळणार, कारण..”

नेमकं काय घडलं?

बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर शुक्रवारी संध्याकाळी काही मित्रांबरोबर बसले होते. याचवेळी तीन दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी आर्मस्ट्राँग यांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र पळून गेले. त्यानंतर हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँगवर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर आरडाओरडा होताच त्यांचे कुटुंबीय बाहेर आल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटुंबियांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

आर्मस्ट्राँग कोण होते?

आर्मस्ट्राँग हे बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी २००६ शहरातील प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर ते २००७ साली बहुजन समाज पक्षात सहभागी झाले. तामिळनाडूत आर्मस्ट्राँग यांच्या नेतृत्वात बहुजन समाज कार्यरत होता. दरम्यान, आर्मस्ट्राँग यांची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bahujan samaj party leader tamil nadu state president armstrong death marathi news gkt
Show comments