पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन नाकारला.

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीने २००६ च्या माफी धोरणातील सर्व अटींचे पालन केल्याचा दावा केला आहे.

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या जामिनाप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ७ जानेवारीला गवळीला २८ दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. नागपूर कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी अर्ज फेटाळल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठापुढे याचिका केली होती.