बेनझीर भुट्टो हत्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, यानंतरही मुशर्रफ यांना नजरकैदेतच ठेवण्यात येणार आहे. २००७मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू करण्यात आली होती त्या वेळी मुशर्रफ यांनी डझनभर न्यायाधीशांना स्थानबद्ध केले होते. याखेरीज, २००६मध्ये बलुची नेते अकबर बुगती यांची लष्करी कारवाईत हत्या करण्यात आली होती. या दोन्हीप्रकरणी मुशर्रफ यांच्याविरोधात खटले सुरू आहेत. े त्यांना मुक्त करण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले.

Story img Loader