जगभरात ख्रिसमसचा सण आनंदाने साजरा केला जात आहे. लहान मुलं उत्सुकतेने सांता क्लॉजकडून भेटीची अपेक्षा ठेवत आहेत. अशातच उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेने सांता क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांता क्लॉजच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून पुतळाही जाळला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजरंग दलाने ख्रिसमस सणालाच विरोध केला आहे. सांता क्लॉज किंवा ख्रिसमसच्या नावावर लोकांची दिशाभूल केली जात आहे आणि धर्मातरणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप बजरंग दलाने केला आहे. तसेच हिंदूंनी यापासून सावध राहावं असंही म्हटलंय. या देशात केवळ हिंदूत्व चालेल, असंही बजरंग दलाने म्हटलं. तसेच जय श्री रामच्या घोषणा दिल्याचं सत्यहिंदी या संकेतस्थळाने वृत्तांकन केले आहे.

हेही वाचा : Christmas 2021: नाताळ सण का साजरा केला जातो? जाणून घ्या तारीख, इतिहास आणि महत्व

दरम्यान, कर्नाटकमध्ये मांडया जिल्ह्यात एका शाळेत सुरू असलेल्या ख्रिसमसचा कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला. हे कार्यकर्ते निर्मला इंग्लिश स्कुल अँड कॉलेजमध्ये शिरले आणि त्यांनी विरोध केला. तसेच शाळा हिंदू सण साजरे करत नाहीत, असा आरोपही केला. हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang dal activist slogan against santa claus and burn statue in uttar pradesh pbs