शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी झगडणारा ज्येष्ठ नेता देशाने गमावला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली. मुखर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना शोकसंदेश पाठविला असून बाळासाहेबांच्या निधनामुळे आपल्याला तीव्र दु:ख झाल्याचे या संदेशात म्हटले आहे. बाळासाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचेही नुकसान झाले   असून हे दु:ख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने आपण आणि आपल्या कुटुंबियांना  द्यावे, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.     

Story img Loader