Balochistan Attack Gunmen Killed 20 Miners in in southwestern Pakistan : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातून खळबजनक घटना समोर आली आहे. येथील एका कोळसा खाणीवर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात खाणकाम करणाऱ्या २० मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बलूचिस्तान प्रांत वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून धगधगतोय. अशातच आज पुन्हा एकदा या प्रांतात खळबळजनक घटना घडली आहे. पाकिस्तानमध्ये एससीओ बैठकीमुळे (Shanghai Cooperation Organization (SCO) Council of Heads of Government meeting) संरक्षण यंत्रणा सतर्क असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीच्या सुरक्षेच्या कारणास्वत देशभऱात लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने लोक जमू शकतात अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. अशातच बलूचिस्तानमधील कोळसा खाणीवरील या हल्ल्याने पाकिस्तानमधील सरकार व सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
Balochistan Attack : पाकिस्तानात रक्तरंजित रात्र! बलूचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून २० खाणकाम मजुरांची हत्या
Balochistan Attack 20 Miners Killed : या हल्ल्यात २० जणांचा बळी गेला असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-10-2024 at 09:53 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSआंतरराष्ट्रीय बातम्याInternational NewsदहशतवादTerrorismदहशतवादी हल्लाTerror Attackपाकिस्तानPakistan
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balochistan attack pakistan armed men firing killed 20 miners 7 injured asc