मुस्लिमविरोधी चित्रण असल्याचा आरोप करीत तामिळनाडू सरकारने बंदी घातलेल्या वादग्रस्त ‘विश्वरूपम’ या चित्रपटाला मुद्रास उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज्य सरकारने चित्रपटावर घातलेली बंदी न्यायालयाने उठवल्यामुळे या चित्रपटाचे अभिनेता-दिग्दर्शक कमल हासन यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
काही मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तामिळनाडू सरकारने चित्रपटावर बंदी घातली होती. याविरोधात कमल हासन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  दिर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्या. के वेंकटरामन यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या चित्रपटाचा मार्ग मोकळा केला. विश्वरूपमला सेंसर बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यात देण्यात आलेले नसल्याचे तामिळनाडू सरकारतर्फे सुनावणीदरम्यान न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर, चित्रपटाला नियमानुसारच प्रमाणपत्र मिळालेले आहे. गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी गृहसचिवांनी चित्रपट पाहून सुचवलेले चित्रण कापण्यात आल्याचे  कमल हासनच्या वकिलांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा