काश्मीरच्या बांदिपोरा सेक्टरमध्ये रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले.  झहीर अब्बास असे शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अजूनही संघर्ष सुरु आहे. अद्यापही भारतीय जवानांकडून या भागात शोध मोहीम सुरुच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांदिपोरामधील हाजिन भागातील मीर मोहल्या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहीम हाती घेण्यात आली. भारतीय जवान, सुरक्षा दलाचे जवान आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत संपूर्ण मीर मोहल्याला घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जवान आणि दहशतवाद्यांच्यातील चकमकीनंतर जवांनाच्या दिशेने दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandipora encounter two militants killed and one constable martyr in gun battle
Show comments