भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेशात आता दुसरी परदेशी विमा कंपनी व्यवसाय करणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही अटींवर आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाला इरादापत्र दिले आहे. या अटींची पूर्तता झाल्यानंतर महामंडळ आपला व्यवसाय सुरू करू शकते, असे बांगलादेश विमा विकास आणि नियामक प्राधिकरणाचे प्रमुख एम. शेफाक अहमद यांनी सांगितल्याचे एका वृत्तवाहिनीच्या हवाल्याने म्हटले आहे.
बांगलादेशात व्यवसाय करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे नामकरण एलआयसी बांगलादेश लि. असे करण्यात येणार असून ती संयुक्त कंपनी असेल आणि त्यासाठी एक अब्ज टका भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वी नियामक प्राधिकरणाने घेतला आहे.

Story img Loader